रुबाब करवीर नगरीचा

रुबाब करवीर नगरीचा

देशात आणि जगात आपल्या ठसकेबाज रांगड्या शैलीने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली कोल्हापूरची माती पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असते,
खासबाग, रंकाळा, शालिनी पॅलेस, महालक्ष्मी मंदिर, शिवाजी विद्यापीठ, जोतिबा,पन्हाळा अशी अनेक पर्यटन स्थळे कोल्हापूर चा वारसा दिमाखात सांगत असतात

बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांना आपल्या नगरीचं दर्शन घडवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या “मुंबई दर्शन” “पुणे दर्शन” आशा योजना आणि गाड्या ऐकल्या अनुभवल्या होत्या
पण आज सकाळीच आमच्या शिवाजी विद्यापीठासमोर ही “करवीर दर्शन” ची सजलेली आणि नटलेली गाडी पाहून अभिमानाने मिशीला पीळ देण्याचा मोह आवरता येत न्हवता, पण मिशाच सापडल्या नाहीत (#NOSHAVENOVEMBER संपल्यामुळे सध्या मिशा कुरतडल्यात 😜) असो…!

भगवा फेटा परिधान केलेला चालक रुबाबात गाडी चालवतोय, त्याच्या सोबतच त्याच कोल्हापुरी पेहेरवात वाहक पर्यटकांना पर्यटन स्थळांची माहिती देतोय, आणि पर्यटक लुकलूकत हे सारे नजरेने टिपटायत
वा मंडळी, काय झाक नजारा हाय राव !

आमचं शिवाजी विद्यापीठ पण कोल्हापूरच्या शिरपेचातला मानाचा तुरा, हेच बहुतेक तो वाहक पर्यटकांना सांगत असावा 🤗

या की राव एकदा आमचं कोल्हापुर हिंडायला..!

– vin$विनायक

https://envinayak.wordpress.com

12/12/2017 (12.21 pm)

Advertisements

आशेची भुक आणि भुकेचा धर्म

आई चुलीवरच्या मोकळ्या भांड्यात चमचा फिरवत राहिली,

आणि भुकेली लेकरं वाट बघून झोपी गेली.

होय, आज कित्येक घरात उपाशी पोटातला जाळ केवळ आशेच्या पावसानं विझतो,

उद्या तरी तुकडा मिळेल या आशेवर येणारा प्रत्येक दिवस ढकलला जातो,

किती तरी आया हृदयाचं पाणी करून पोरांची तहान भागवतात,

रिकाम्या ताटातील भाकरीचं चित्रं बघून पोरं आशेचा ढेकर देतात,

विखुरलेल्या स्वप्नांची शिते एकत्र करून बोलाचाच भात शिजवला जातो,

त्याला ही आपली दया यावी आणि फुटावा पान्हा त्या दगडाला या भाबड्या आशा घेऊन कित्येक केविलवाण्या नजरांचा मंदिराबाहेर पोटाच्या खड्यासोबत भुकेच्या भक्तीनादाचा अखंड गजर सुरू असतो.

त्याच्यावर दुधाच्या प्रसादाचा अखंड पाऊस पडत असताना या रिकामपोट्या बेबस आणि लाचार नजरा लाळेचा घोट घेऊन तृप्त होत असतात.

– Vin$ विनायक

(जेवल्यावर ताटात शिल्लक राहिलेल्या अन्नाकडे पाहिल्यावर माझ्या या ओळी आठवल्या तर लिहून धन्य झालो असे समजेन)

राजकारण आणि सोयीचा इतिहास

इतिहासाची मोडतोड करीत आपला अजेंड्याकडे किंवा प्रोपोगंडा च्या बाजूला लोकमत वळवुन सहमतीचं राजकारण करून सत्ता बळकवण्याचे प्रयत्न इतिहासात खुप वेळा झाले आहेत.

*घडून गेला तो इतिहास असतो*

कोणी कधीच दावा करू नाही शकत की हाच इतिहास 100 टक्के खरा आहे.
कारण तो फक्त ऐतिहासिक साधनांवरून पुष्टी करून बांधलेला एक अंदाज असतो.

इतिहासातील अंतिम सत्य हेच आहे की
*इतिहास हा जिंकणार्यांनी लिहिला आहे*

त्यामुळं तो 100 टक्के खरंच आहे असं म्हणणे योग्य होणार नाही.

दुसरा मुद्दा

आपल्या अस्मिता जरी स्वकीयांशी जोडल्या गेल्या असल्या तरीही परकीय म्हणून आलेले पण इथेच स्थानिक झालेले मुघल भारतीय इतिहासाचा अविभाज्य घटक आहेत, एक इतिहासाचा अभ्यासक या नात्याने त्यांना वगळून इतिहास पूर्ण होणे नाही.
त्यांच्या येथील साम्राज्यात एक मिश्र संस्कृती निर्माण झाली,
आजच्या जागतिक वारसा म्हणून उभ्या असलेल्या कित्येक वास्तू या संस्कृती चे पुरावे आहेत
आजची भारतीय राजधानी मुघलांनी वसवलेल्या दिल्लीत च आहे हे विसरून चालणार नाही.
ताजमहाल,कुतुबमिनार, लाल किल्ला, राष्ट्पती भवन, संसद,रेल्वे या सगळया परकीयांनी बांधल्या म्हणून त्या तोडून टाकणे योग्य होईल का ?

जसे काही परकीय इंग्रजांनी भारतीय इतिहास लिहिला तसाच तो इब्न बतूता किंवा इतर मुघल इतिहासकारांनी सुद्धा लिहिलाय
त्याचवेळी काही स्वकीयांनी सुद्धा लिहिलाय

मग जर या मध्ये प्रत्येक इतिहासकार आपापल्या राज्याप्रति निष्ठा प्रकट करीत असेल तर मग यापैकी नक्की कोणाचा इतिहास खरा मानायचा हा मोठा प्रश्न आहे.

तिसरा मुद्दा

गांधी,आंबेडकर,नेहरूं,पटेल,बोस या सारख्या अनेक इतिहासातील महापुरुषांच्याबद्दल सध्या होणाऱ्या उलटसुलट चर्चा हा केवळ सोयीचं राजकारण असण्यापलीकडे काहीही नाही,

कारण वरील ऐतिहासिक महापुरुषांना अनेक खुप मोठे समाजसमूह अस्मितेने जोडले गेले आहेत, त्या महापुरूषांच्या बद्दलच्या राजकीय भूमिका पाहून ते समाजसमूह आपली राजकीय मते ठरवत असतात,
त्या मतांना आपल्याकडे खेचण्यासाठी काल्पनिक,अतिरंजक, उदात्तीकरण करणारा आणि कान सुखावणारा किंवा उलटपक्षी भडकाऊ, धादांत खोटा, द्वेषपुर्ण, चारित्र्य हनन करणारा खोटा इतिहास जाणीव पूर्वक पसरवला जातोय किंवा लादला जातोय.
त्यात अजून वरकडी म्हणून
आपण भारतीय इतिहास स्वतः वाचून समजून घेण्यापेक्षा दुसर्याकडून ऐकून समजून घेणारे असल्याने बोलणाऱ्यांचे अच्छे दिन आले आहेत.

फोडा आणि राज्य करा हा गोऱ्या इंग्रजांचा डाव काळे इंग्रज खेळत आहेत.

चौथा मुद्दा

इतिहासातून धडे काय घ्यायचे हा ज्याच्या त्याच्या प्रगल्भतेचा प्रश्न आहे, तो वर्तमानाशी जुळवणे आणि त्याला आपल्या अजेंड्याला पाठबळ देणारा बनवणे ही वड्याचे तेल वांग्यांवर काढण्यासारखे आहे असं जरी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.

तात्पर्य हेच की इतिहासाची जी काही खोडसाळ विटंबना राजकारण्यांनी लावली आहे ती आपण गंभीरतेने घेऊन त्याविरोधात भुमिका घेतली पाहिजे.
आणि सध्या जो प्रपोगंडा राबवून सहमतीच्या राजकारणाचा प्रयत्न काही शक्ती करत आहेत त्याचा विरोध करायला हवा.

– विनायक

साहित्यातील तरुण

, आजकाल असा एक तक्रारीचा सूर कानी पडतोय की आजचा तरुण वाचत नाही, लिहीत नाही आणि बोलत ही नाही. पण माझ्यामते हे अर्धसत्य आहे. आजचा तरुण वाचतोय, लिहितोय सुद्धा आणि बोलतोय सुद्धा , उदयोन्मुख तरुण लेखक सुद्धा काही कमी नाहीत नुकताच मी विशाल गरड म्हणून एका तरुणाने लिहिलेलं *रिंदगुड* पुस्तकाबद्दल ऐकलं आहे अस्सल ग्रामीण शैली मध्ये लिहिलेला संग्रह आहे तो शिवाय आपले श्रीरंजन आवटे सर देखील अगदी तरुण वयापासूनच दर्जेदार लिहीत आहेत असे अनेक तरुण माझे मित्र आहेत ज्यांची कल्पनाशक्ती अफाट आहे, खुप काहीतरी वेगळं आणि नवीन सुरू असत त्यांच्या कवटीच्या आत पण ते कट्ट्यावरच्या चर्चेच्या पलीकडे नाही जाऊ शकत करण ती कल्पना कुठे वापरायची हे माहीत नसणे असो संधीच अवकाश माहीत नसणे म्हना किंवा त्यांची स्वतःची अनास्था..! वेगवेगळ्या कारणांमुळे जे बाहेर यायला पाहिजे होतं ते वाया जात आहे या बद्दल खुप वाईट वाटते साहित्य क्षेत्रातील तरुण शोधायला कुठल्याश्या साहित्य संमेलनाच्या ठिकाणी जायला हवे असे नाही बरं का, तो तुम्हाला शेताच्या बांधावर सापडेल , कुठल्याश्या पानपट्टी च्या कोपऱ्यावर, किंवा चहाच्या टपरीवर मिळेल पुस्तकं वाचुन लिहिणारे खुप भेटतील पण माणसं वाचून लिहिणारे क्वचित भेटतात कारण ते जे लिहितात ते जगत असतात. ग्रामीण तरुण असो वा शहरी .. प्रेम हा त्याचा जिव्हाळ्याचा विषय 😍 खुप सुंदर कथा काही खऱ्या काही काल्पनिक काही विनोदी काही सैराट सगळं सगळं इथे मिळु शकतं पण त्यासाठी वाचणाऱ्याला पण पुस्तकं सोडुन जग वाचता यायला हवे. तसं आपल्या पिढी मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाचणारा वर्ग तयार व्हायला हवाय काही वाचणारी मित्रमंडळी सुद्धा आहेत, माझे मित्र मयूर डॉ अरुण मनीष यांच्या रूम वर दर्जेदार पुस्तकं आहेत छोटसं ग्रंथालय च म्हणा ना मी तिथे गेलो की पुस्तकांचा कप्पा चाळण्याचा मोह आवरत नाही वर्तमान पत्रात स्तंभ लिहणार तरुण सुध्दा आहेत पण संख्येने मर्यादित ही संख्या वाढत गेली पाहिजे असे मला वाटते लिखाण हे विचार व्यक्त करण्याचे शक्तिशाली साधन आहे याची जाणीव तरुणांना लिहिणार्यांनी करून देणे गरजेचे आहे, शब्द विरून जातात पण लिखाण शाश्वत आहे. त्याचा वापर करण्याची योग्य आणि सभ्य पद्धती पण लेखकाने आपल्या शैलीतून नवीन वाचकांच्या मनावर ठसवावी लागेल तरुणांना लिहिते करण्यासाठी त्यांना वाचते करणे खुप महत्वाचे आहे. आणि त्या साठी त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्नावर बोट ठेवणे सोईस्कर होईल असे मला वाटते आणि शेवटी ही जबाबदारी सिनियर लेखकांवर पडते जसा बाप आपल्या पोराला बोट धरून चालायला शिकवतो तसं या तरुण उदयोन्मुख लेखकांना सिनिअर वरिष्ठ लेखकांनी प्रोत्साहन द्यायला हवे तरच पुरोगामी महाराष्ट्राचा वाचनसंस्कृती चा वारसा पुढे जपला जाईल. – vins 9 नोव्हेंबर2017 5.00 pm

साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक अनुभव कथन

“छावणी तो हर दिल में एक चिंगारी जगा देती है,

उस चिंगारी को छावणी प्लस शोला बना देती है.”

_स्मारक काय आहे ?_

स्मारक विश्वाचे हृदय आहे. मानवतेचा आत्मा आहे. *“जगाला प्रेम अर्पावे”* हा विश्वशांतीचा संदेश ज्या महामानवाच्या हृदयात जागला आणि *“खरा तो एकची धर्म”* समजुन जो महामानव जगला त्या महामानवाचा जिवंत साक्षात्कार म्हणजे *“साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक”* होय.

युवा छावणीने स्व भान ते समाजभान हा प्रवास करण्यात मोलाची मदत केली होती, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून स्वतःचा शोध घेण्यासाठी युवा वर्ग इथे जमला होता. प्रत्येकाचा स्वतःला नव्याने उलगडण्याचा अनुभव अवर्णनीय होता. एक विचारांची प्रक्रिया सुरु झाली होती. चेहऱ्यांच्या गर्दीत मी हरवून जाणारा नाहीये, मी वेगळा आहे, मी कार्यकर्ता आहे भविष्याचा, उद्याच्या सदृढ भारताचा एक जबाबदार नागरिक म्हणून मला ही जबाबदारी माझी स्वतःची वाटते अशा प्रकारची जाणीव प्रत्येक युवकाच्या मनात जागी करण्यात छावणी चा मोठा हात आहे. छावणीच्या निमित्ताने प्रत्येकाच्या मनात पेटलेल्या या जाणिवेच्या ठिणगी ला फुंकर घालून तिची मशाल करण्याचे काम छावणी प्लस म्हणजेच कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर करते. इथला प्रत्येक कार्यकर्ता भविष्यात होऊ घातलेल्या या सामाजिक क्रांती च्या अग्निकुंडात झोकून देण्यासाठी सज्ज होत आहे. स्वतःला आजमावून पाहत आहे. बदलाचे शिवधनुष्य पेलण्याकरिता मेहनत घेत आहे.

_आम्ही कोण आहोत ?_

आम्ही बदलावर विश्वास ठेवणारी माणसे आहोत, आणि अशीच बदलावर विश्वास ठेवणारी पिढी घडवण्याचे काम करणार आहोत कारण फक्त बदल हाच शाश्वत आहे आणि यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.

_या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात आम्ही काय शिकलो ?_

कार्यकर्ता म्हणून जगताना आत्मसात करावया लागणारी कौशल्ये प्रमोद सरांकडून आम्हाला छावणी प्लस मध्ये शिकता आली. कार्यकर्त्याचा दृष्टीकोन काय आणि कसा असावा हे रंजकपणे उलघडून सांगितले. स्मारकाचा विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मिडिया सामुहिक पणे वापरण्यासाठी आपले कार्यकर्ते सज्ज होत आहेत. लोकशाही ला धोका असणाऱ्या fasist वादी शक्तींच्या वाढत्या प्रभावाला थोपवण्यासाठी आम्ही तयार होत आहोत. अश्विनी ताई आम्हाला मुक्तपणे निर्भयपणे व्यक्त होण्यासाठी मदत करीत आहे. *“अव्यक्त आम्ही, आता व्यक्त होऊ,* *क्रांतीची ही मशाल, अखंड पेटती ठेवू.”*

युवराज सरांशी संवाद म्हणजे विचारांची मेजवानीच जणु, सदैव हसतमुख, नेहमी भेटल्यावर आश्वासक हातमिळवणी आणि आपुलकीची जादू की झप्पी असतेच असते. त्यांच्यासोबत चर्चा करताना स्मारकाचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य एकाचवेळी आम्ही अनुभवत होतो आणि स्मारक अजून जवळून समजुन घेत होतो. स्मारकाचा विचार महाराष्ट्रभर पोहोचवण्यासाठी microplanning करून त्याची आम्ही अंमलबजावणी करीत आहोत. या शिवाय नीरजा ताई नी आमच्यावर टाकलेला विश्वास आम्हाला जबाबदारीची जाणीव करून देत आहे. प्रेरणाप्रबोधन साठी आम्ही वेळ काढून नक्की येणार आहोत असं सतीश दादा ला आम्ही आश्वासित केलं आहे कदचित म्हणूनच रात्रीची मैफल जोरात रंगली होती. येत्या काळात शिबिरे घेण्यासाठी आम्ही तयार होत आहोत तर एखादी emergency आलीच तर प्रथमोपचाराची माहिती सुद्धा आम्ही समजुन घेतली. मुलांचे खेळ आणि गाणी हे आम्ही जयवंत दादा, वर्षा ताई आणि चिंतामणी दादा कडे पाहून शिकत आहोत. इंदुलकर सरांच्या मोरांच्या शाळेत समाजात प्रामाणिकपणे काम करणारी सामान्य व्यक्ती देखील कशी समाजसेवक असते हे समजून घेता आलं. एकूणच काय तर या मंथनातून स्वतःमधील कार्यकर्त्याचा शोध सुरु झाला आहे. स्वतःला घडवीत स्वतः मधील कार्यकर्त्याला देखील घडवायचे आहे ही शपथ घेऊनच आम्ही पाऊल उचललं आहे. आपल्याला एकमेकांच्या सोबतीनेच हा प्रवास करायचा आहे. तुम्ही आहात ना सोबत ?

चला तर मग हे गीत गात बदलाच्या प्रवाहात सामील होऊया

“आम्ही विद्रोही प्रकाशबीजे,

आम्हास काय भीती

आशेचे नवे सूर्य,

उगवले चहुदिशी

तेजस्वी विचारांची घेऊन अस्त्रे,

पोलादी मनगटे चालवतील शब्दांची शस्त्रे

कापीत जायची आहेत प्रचंड भयानक तुफाने,

आमचे भविष्य आम्ही, पुन्हा लिहू नव्याने”

✒ आपलाच 👉 मी

मी अथांग समुद्रा सारखा… किनाऱ्यावर उथळ भासलो तरी खोलात दूरवर जाणारा…! मी अथांग समुद्रा सारखा… गारवा उधळीत असलो तरी सुर्याला ही सामावणारा…!

– विनायक शालन महादेव

WhatsApp- 7588167721

GMail- envinayak@gmail.com

मला वाचण्यासाठी अवश्य भेट द्या- https://envinayak.wordpress.com

Facebook मित्र बना – https://www.facebook.com/vinayaksalunkhe21

YouTube चे subscriber व्हा- https://youtu.be/ZvBnd4QDr_Q

इथे टिव टिव करा- Check out Vinayak Salunkhe on Twitter. Just being like myself https://twitter.com/envinayak?s=17

I’m on Instagram as @vins_rocks.

जवाब दो…!

आज गौरी लंकेश यांचा झालेला खून हा एका खुनाच्या सत्रातील एक भाग आहे, गेल्या काही वर्षांपासून असहिष्णुता वाढत आहेआणि ते दिवसेंदिवस उग्र रूपधारणकरीत आहे, अजून असे किती बळी पडू द्यायचे आपण ? याचा जाब विचारणार आहोत की नाही आणि त्याची उत्तरे सरकार देणार आहे की नाही ?

हो..! ; आज उत्तरं द्यावीच लागतील..! पण फक्त मुठभर लोकांनीच “जवाब दो..!” म्हणून जाब विचारून भागणार नाहीये तर याला मोठ्या प्रमाणावर लोकांनी जाब विचारला पाहिजे कारण हा प्रश्न आपल्या सामाजिक सुधारणेच्या एका महत्वाच्या टप्प्यावरचा आहे, काही बुद्धिभ्रष्ट जमात नीच स्वार्थासाठी संपूर्ण समाजाला वेठीस धरून विषमतेचे विष कालवत आहे, अनेक लोक; खासकरून तरुण यात ओढले आणि फरफटले जात आहेत, त्यांना बुद्धिभ्रष्ट करण्याची एकही संधी हे कट्टरवादी सोडत नाहीयेत, आणि आपण काय करतोय, तर आपली जबाबदारी झटकून या कडे सहज दुर्लक्ष करतोय, पुराचे पाणी चौकटीला लागल्याशिवाय घर न सोडणारे आपण याच पुरात बुडून मरणार आहोत. पण आपल्याला बऱ्याच वेळा हे दिसत नाही, कधी कधी डोळ्यासमोर असणारे सत्य सुद्धा आपणास दिसत नाहीत कारण सत्य आणि तथ्य दिसण्यासाठी फक्त डोळे उघडे असण्यापेक्षा तसा दृष्टीकोन असणे पण महत्वाचे असते, आणि दुर्दैवाने आपण आपला सद्सद्विवेक दृष्टीकोन अजून विकसित करू शकलो नाही. हे सत्य आहे की नाही कुणास ठाऊक ? की जगातले सर्वात उत्तम गुलाम भारतात राहतात ? आणि म्हणूनच की काय तुर्क इराणी मोगलांपासून ते सातासमुद्रापल्याड हून आलेल्या इंग्रजांनी आपल्याला कित्येक वर्षे गुलामगिरीत ठेवले. गोरे इंग्रज तर गेले पण आज काळे इंग्रज लोकशाहीच्या नावाखाली घराणेशाही तर झुंडशाही व सामुहिक दादागिरीच्या जोरावर गुलामगिरी राबवत आहेत.

अभिव्यक्ती स्वतंत्राचा तर गळा चिरला जातोय तर विचार आणि भाषण स्वातंत्र्याला दिवसा ढवळ्या गोळ्या घातल्या जातायत, दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश या सारखे सुधारणावादी पुरोगामी मारले जात असताना यांची हत्या करणारे मात्र मोकळे फिरत आहेत आणि या क्रूर अन्यायाचे आपण फक्त दर्शक आहोत, आणि थंड आहोत. जंगली श्वापदांना काय म्हणून घाबरायचे ? इथे तर माणूसच नरभक्षक झालाय. इथे माणूस मेलाय, इथे निर्दोष मेलाय, इथे न्याय मेलाय.

तथाकथित धर्मगुरूंच्या मते गो-हत्या पाप आहे पण धर्माच्या नावाखाली माणसांच्या कत्तली करवून आणणारे पण हेच आहेत तेव्हा हा कसला विरोधभास म्हणायचा, माणसाच्या जीवापेक्षा गाईच्या जीवाला महत्व प्राप्त झाले आणि गो-रक्षनार्थ नरबळी घेणाऱ्याला शिक्षेच्या ऐवजी धर्मवीर,गोरक्षक या पदांची प्राप्ती होत आहे. कारण इथे रस्त्यावर पडलेले मुडदे आक्रोश करताहेत पण कोर्टात जबाब देणारे गांगरून दातखिळी बसल्यासारखे थंड आहेत, सनातनवाद्यांकडून धर्माच्या नावाखाली निर्दोष मारले जात असताना सरकार अळीमिळी गुपचिळी आहे जणू यांची वाचा बसली असावी.

सांप्रदायिक दंगली मध्ये जाळपोळ, हिंसा, सामुहिक अत्याचार हे चित्र जणू सवयीचे बनले आहे, या तापलेल्या वातावरणात आपली राजकीय पोळी भाजून घेणे हे कौशल्य यांना आता चांगलेच अवगत झाले आहे आणि त्याला खत पाणी म्हणून मग नागरिकांच्या जीवाचा जुगार लावून वोट बँकेचे राजकारण कसे करावे या साठी संघ ‘स्कील डेवलपमेंट’ ची शिबिरे भरवत आहे. सगळेच पक्ष सत्तेसाठी हा जुगार खेळण्यास सज्ज आहेत. यात आजचा गोंधलेला भांबावलेला युवक भरडला जात आहे आणि तो कट्टरपंथीयांच्या जाळ्यात ओढला जात आहे. मंदिर मस्जिद यांचे घाणेरडे राजकारण दिल्लीपासून गल्लीपर्यंत पाझरत आहे आणि हे भयावह आहे, जर देवाला, अल्लाह ला आपल्या मनातच जागा नसेल तेव्हा मग या मंदिर, मस्जिद असण्याचा फायदा काय ?

अमीर खानच्या वक्तव्यावरून त्याला देशद्रोही ठरवण्याच्या अगोदर कुणीतरी या नेत्यांच्या भाषणावर पण लक्ष द्यावे, विषमतेचे विष हेच जास्त ओकत असतात. त्या अभिनेत्याला त्याच साध मत ही व्यक्त करू दिल जात नाही ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हत्या न्हवे तर मग काय आहे. लेखकांनी साहित्यकारांनी पुरस्कार वापसी केली ते मग काय चुकीचे होते का, जर लिहायचे स्वतंत्र च नसेल तर पुरस्कार काय कामाचा ? इथे कुणी काय बोलायचे आणि कुणी काय लिहायचे हे ठरवणारे नवे राज्यकर्ते तुमच्यावर राज्य करीत आहेत याची जाणीव असुद्या फक्त, “मुह में राम और बगल में छुरी” घेऊन फिरणारे नेते तुम्हाला कधी गुंडाळतील कळणार पण नाही, यांच्या शिक्षणाच्या बनावट डिग्री बद्दल बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही कारण यांची डिग्रीच न्हवे तर बुद्धी सुद्धा भ्रष्ट आहे.

घरवापसी असो वा लव जिहाद असो हा सगळा “फोडा, झोडा आणि राज्य करा” या एकमेव कारणासाठी देशद्रोही नेत्यांनी देशाच्या नागरिकांच्यासोबत केलेला द्रोह आहे. आणि कोण देशभक्त आणि कोण देशद्रोही याचा फैसला हेच नेते करणार. आपण जर आपली देशभक्ती फक्त पाकिस्तानविरुद्ध च्या क्रिकेट सामन्या पुरती दाखवत असू किंवा १५ ऑगस्ट , २६ जानेवारी पुरती हंगामी देशभक्ती दाखवत असू तर मग आपल्यापेक्षा हे नेते बरे म्हणायचे.

अन्यायाविरोधात बोलणारया कन्हैया सारख्या विद्यार्थ्यांना देशद्रोही म्हणून सीडीशन चार्ज लावले जात आहेत, मिडिया तर अर्धवट सत्य दाखवून टीआरपी च्या आमिषाने चोर सोडून संन्याशाला आरोपीच्या पिंजरयात उभे करत आहे. सोयीप्रमाने चित्रफितींची काटछाट करून त्यांना ब्रेकिंग न्यूज केले जात आहे. एखाद्याच्या वक्तव्याचा विपर्यास कसा करावा हे मिडिया कडून शिकावे.

मिडिया ने सरकार ला जाब विचारणे अपेक्षित असताना या मिडिया ला जाब विचारणार कोण ?

अन्यायाचे बळी ठरलेल्याना न्याय देणार कोण ? हे प्रश्न आज ही अनुत्तरीत आहेत.

मला माहिती आहे की आपल्यासारखे सामान्य नागरिक जास्त काही करू शकत नाहीत पण म्हणून शांत बसून अन्याय सहन पण नाही करू शकत ना !

एखाद्या वर्गात ५० विद्यार्थी आहेत ज्या पैकी ४-५ जन बिघडलेली आहेत आणि ते पूर्ण वर्गाचं वातावरण कलुषित करीत आहेत, कारण अन्य विद्यार्थी त्यांना हे करू देत आहेत ते संख्येने जरी जास्त असले तरी शांत बसून दर्शकाच्या भूमिकेत आहेत, पण त्या ४-५ जणांच्या चुकीची शिक्षा सगळ्या वर्गाला भोगावी लागत आहे. अगदी तसच आपल्या समाजात सुद्धा वाईट प्रवृत्ती फोफावल्या कारण तुम्ही आम्ही दर्शक बनलो आहोत, सहन करीत आहोत, षंढ पणे थंड आहोत. पण आता थंड बसून चालणार नाहीये पाणी गळ्यापर्यंत याले आहे नाकातोंडात जायला अवकाश लागणार नाही जर तुम्ही जाब विचारला नाही. माझा विश्वास आहे की आपल्या समाजात चांगल्या प्रवृत्तीची माणसे भरपूर आहेत त्यांना बघ्याच्या भूमिकेतून बाहेर पडावेच लागेल, उघडपणे अन्यायाविरुद्ध आवाज उठवावाच लागेल, “जवाब दो..!” म्हणून जाब विचारावाच लागेल.

विनायक साळुंखे
७५८८१६७७२१
envinayak@gmail.com

I stand alone

मनगटावरील गुंडाळलेल्या दोऱ्यापेक्षा मनगटामधील ताकतीवर विश्वास आहे माझा,

गळ्यावर लावलेल्या अंगाऱ्या पेक्षा माझ्या वक्तृत्वावर विश्वास आहे माझा,

कपाळावरील गंध विभूती पेक्षा माझ्या मेंदुवर आणि त्याच्या विचारांवर विश्वास आहे माझा !